maharashtra day, workers day, shivshahi news,

प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवा शेतकऱ्यांनी केली मागणी

अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Heavy damage to farmers due to hailstorm , buldhana , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, प्रतिक सोनपसारे ( जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा )

२६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या अवकाळी पाऊस व गारपीटीचे नोंद महसूल मंडळात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. कारण ज्या मंडळात एकच स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याच्या रेंजच्या बाहेर असणाऱ्या गावांना त्याचा फटका बसत आहे. व त्यामुळेच विमा कंपनी या अवकाळी पाऊस व गारपीट ची नोंद घेत नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे फॉर्म अपलोड होत नाही. प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 तर जिल्ह्यात एकूण ९२ मंडळ असून ९२ मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहे. दोन ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राची चोरी झाली असून, या हवामान केंद्राच्या २५ किलोमीटर पर्यंतची रेंज असते. यामध्ये नुकसानीची नोंद घेते ही नोंद महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कायमेट या संस्थेतर्फे कृषी विभागाला मिळते त्याच्या अनुषंगाने पीक विमा कंपनीला तो अहवाल पाठवून जे नुकसान झालेले क्षेत्र आहे, त्याला विमा संरक्षण देण्याचे तरतूद करतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी दिली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !