संग्रामपूर पंचायत समिती मधील दहावी व बारावी कस्टडी रूम मधील घटना
शिवशाही वृत्तसेवा, प्रतिक सोनपसारे ( जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा )
दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मद्यधुंद शिक्षकांने चांगलाच राडा घातला आहे. ही घटना आज 29 फेब्रुवारीला दुपारी संग्रामपूर पंचायत समिती मध्ये घडली. महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती आज वरवट बकाल येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत केलेली होती. मात्र या शिक्षकाने कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे संग्रामपूर पंचायत समिती मध्ये बराच वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.
सध्या राज्यात होणाऱ्या पेपरफूटीच्या घटना आणि विविध परीक्षेतील भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. वास्तविकता कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात. या रूममध्ये काम नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूममध्ये दस्तूरखुद्द शिक्षकानेच आणि तेही मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे हा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणी संबंधित विभाग काय कारवाई करते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र संग्रामपूर पंचायत समितीमध्ये घडलेल्या या प्रकारमुळे परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा