maharashtra day, workers day, shivshahi news,

पांचगणीत इलेक्ट्रिक चार्जिंग बाईक पेटली - आगीत गाडी जळून खाक

पांचगणीतील बिलिमोरीया रोडवरील भाजी मार्केट समोर घडली दुर्घटना
Five electric charging bikes caught fire , satara , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पांचगणीतील बिलिमोरीया रोडवरील भाजी मार्केट समोर एका उभ्या असलेल्या इलेक्ट्रॉनिक चार्जिंग दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती अशी की, वाईतील एक व्यावसायिक युवक आपली इलेक्ट्रिक चार्जिंग दुचाकी रस्त्यावर उभी करून  जवळच्या दुकानात गेला होता. थोड्या वेळानंतर दुकानातून बाहेर आल्यावर त्याला त्याच्या दुचाकीमधून धूर येत असल्याचे दिसले. क्षणार्धात दुचाकीने आग धरली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.
आसपासच्या  व्यापारी आणि नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग खूप प्रचंड होती त्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. नंतर तातडीने पांचगणी नगरपालिका अग्निशामक बंबाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आग विझवण्याची कारवाई केली.
या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना आणि वापरताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही महिन्यापूर्वी वाई शहरांमध्ये अशाच  एका इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला होता. चार्जिंग असणाऱ्या इलेक्ट्रिकल बाईकवर सुरक्षिततेचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !