maharashtra day, workers day, shivshahi news,

दहावी,बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षक समन्वय संघाचा बहिष्कार

सरकारने शिक्षण समन्वय संघाच्या मागण्याला दुजोरा दिली
Boycott of teachers coordination union on 10th, 12th answer sheet examination , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 
शिक्षक समन्वय संघाचे तालुक्याचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नायगांव तालुक्यातील अंशतःअनुदानित शिक्षकांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे बहिष्कार टाकल्याचे निवेदन दि. २७/०२/२०२४ रोजी नायगावचे तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव यांना दिले आहे.
    ०३ जानेवारी २०२४ पासून विविध मागण्यांसाठी चालू असलेले आझाद मैदानावरील आंदोलन त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दहावी, बारावी बोर्ड परीक्षा २०१४ च्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. समान काम समान वेतन या मागणीनुसार मागील पंधरा-वीस वर्षापासून विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांचा संघर्ष चालू तर आहे तरीपण या सर्व मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याचाच रोष म्हणून सर्व विनाअनुदानित व अंशल: अनुदानित शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. या शिक्षकांची मुख्य प्रचलित पध्दतीने अनुदान टप्पा देऊन उघड्यावर पडलेला शिक्षकांचा संसार या निर्णयामुळे सरकारने अर्हता अशी आर्त हाक शिक्षकांनी दिली. निवेदन देत असताना तालुकाध्यक्ष अभिजीत दत्तात्रेय येवते. मोरे डी एम. नाईकवाडे एम एस. ताटे एस. नकाते एन बी. खानापुरे पी एस. पाटील जे एन. चव्हाण गि आर. कु-हाडे जी एक. चव्हाण के डी.ईत्यादी शिक्षक उपस्थित होते.

सरकारने शिक्षण समन्वय संघाच्या मागण्याला दुजोरा दिल्यामुळे सदर गुणपत्रिकेवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे असे शिक्षण समन्वय संघाचे नायगाव तालुका अध्यक्ष अभिजीत दत्तात्रय येवते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !