शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर जिल्हा परिषद परिसरात मोदी सरकार विरोधात बोंबाबोंब करून होळी पेटवण्यात आली. शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि मोदीविरोधक या होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महागाईचा भस्मासुर आणि रावण राज्य संपुष्टात आणण्यासाठी बीजेपीला हद्दपार करणारच अशा घोषणा देण्यात आल्या.
सध्या आचारसंहिता असल्याने आंदोलने उपोषणाला संपूर्ण शहरात बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अशा रीतीने मोदी विरोधी संधी साधण्यात आली आणि प्रचंड महागाई विरोधात फलक तयार करून ते होळीत पेटवण्यात आले. मोदी गॅरेंटी नसून सर्वसामान्य जनतेला मुर्ख बनवत आहेत. असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आणि काँग्रेसला साथ द्या बीजेपीला लाथ द्या अशा घोषणा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा