१५जानेवारी पर्यंतचे सर्व ऊस बील शेतकऱ्यांना अदा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी घौडदौड सुरू आहे. श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरूवात होऊन १०७ दिवसामध्ये ८,०५,८४५ मे. टनाचे गाळप केले आहे. बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने ८,११,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे.
कारखान्याचे आजपर्यंतच्या इतिहासात १०७ दिवसामध्ये ८ लाख गाळप होण्याची पहिलीच वेळ आहे. सदर एकूण ऊस गाळपापैकी 80% ऊस ६,३१,८५५ मे.टन ऊसाचे गाळप हे कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याकडे नोंद दिलेल्या शेतकऱ्यांचे ऊसाचे गाळप केलेले असून उर्वरीत 20% ऊस १,७४,००० मे.टन कार्यक्षेत्रा बाहेरील गेल्यावर्षी ज्यांनी ऊस दिला होता त्या शेतकऱ्याचा ऊसाचे गाळप झालेले आहे. आपल्या श्री विठ्ठल कारखान्याने आत्तापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी रु.२३३.०० कोटी व तोडणी वाहतूकीपोटी रु.७२.५० कोटी रक्कम आशी एकून ३०० कोटीची उलाढाल झालेली आहे. पंढरपूर तालुक्यात आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी, व्यापारी, तसेच लहनमोठे उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे नेते शरद पवार हे माढा येथील कापसेवाडी येथे आल्यानंतर श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साहेब आपला आशीर्वाद असू द्या अजून यांना एक धपका देतो असं वक्तव्य केल्याने सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील कारखान्यामध्ये ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली. मागील व चालू गळीत हंगामात मिळून जवळपास कोट्यावधी रूपये शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम मिळालेली असल्याचे समजते.
सदरचे गाळप करणेसाठी ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगारांच्या प्रामाणिक कष्टातून विक्रीमी गाळप करु शकलो, आणि संचालक मंडळाच्या काटेकोर नियोजनाचे कौतुक चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले. तसेच उपपदार्थ निर्मितीमध्ये आसवानी प्रकल्पातून ३९,४०,४४८ ब. लिटरचे स्पिरीट उत्पादन झालेले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११४ दिवसामध्ये ४,९४,८६,००० युनिटचे उत्पादन झाले असून कारखाना वापर सोडून २ कोटी ८० लाख युनिट विक्री केली.
कारखान्याने दि. १५.०१.२०२४ अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे अनुदानासह बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहे. तसेच श्री विठ्ठल कारखान्याचे तोडणी वाहतूक बिलाचे पेमेंट दि.३१.०१.२०२४ अखेर बँकेत वर्ग केलेले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ऊसास रु.२९५० /- प्र.मे. टन ऊसदर मिळणार आहे व ज्या शेतकऱ्यांचा ऊस मार्च महिन्यात येईल त्या शेतकऱ्यांना रु.३०००/- प्र.मे.टन ऊसदर मिळणार आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, हितचिंतक यांच्यात कारखाना यशस्वीपणे चालू असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री विठ्ठल कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी इतर कारखान्याच्या भुलथापांना बळी न पडता कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील व संचालक मंडळांने ठेवलेल्या ऊस गाळपाचे १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून त्याच मार्गाने घौडदौड सुरू आहे.
भूलथापांना बळी पडू नकाविरोधकांनी अनेक कटकारस्थान करून विठ्ठल कारखाना बंद करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हाणून पाडला आहे. श्री विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये अनेक वर्षापासून विक्रमी गाळप केले आहे. ज्या दिवशी आठ हजार मे.टनाच्या पुढे गाळप होईल त्या दिवशीचा संपूर्ण पगार कामगारांना बक्षीस म्हणून जाहीर केला आहे. कारखान्याकडे नोंदवलेल्या सर्व ऊसाचे गाळप करूनच कारखाना बंद होईल त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.चेअरमन अभिजीत पाटील
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा