एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर)
नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल अंतर्गत असलेल्या कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घुंगराळा परिसरातील शिवारामध्ये काही लोक तिरट जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कुंटूर पोलीसांनी सापळा रचून सात वाजून 30 मिनिटांनी सायंकाळी वेळेस या जुगार अड्ड्यावर धाढ टाकली यातले काहीजण पळून गेले मात्र सहा जणी हाती लागले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे घुंगराळा, रानसुगाव , कुष्णूर, निळेगहान, येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडुन रोख रक्कम 1040 रुपये, गाडी mh26c-A0265, एकुण 1लाख विस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील व कुसमे, बीट प्रमुख पवार हे पुढील तपास करीत आहेत. मात्र कुंटूर पोलीस स्टेशन क्षेत्रात अनेक अवैध धंदे जोरात चालू आहेत. पोलिसांची कारवाई होऊनही दारू, मटका, जुगार, हे धंदे थांबायचं नावच घेत नाहीत, अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा