युवक, वृद्ध, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधून शासकीय योजनांची दिली माहिती
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन (प्रतिनिधी मजहर खान पठाण)
भाजपच्या 'गाव चलो अभियान' अंतर्गत केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला. बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला.
विविध समाजाच्या लोकांना एकत्रित बसवून त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्यानंतर वालसावंगी गावातील केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. लाभार्थीच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला आनंद झाल्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. वालसावंगीजवळील सुंदरवाडी येथील युवकांना भेटून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पीएम मुद्रा योजना, श्रमजीविसाठींच्या योजना, मेक इन इंडिया अंतर्गत स्टार्टअप आणि स्कील डेव्हलपमेंटच्या योजनांचा तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बाळू आहेर, मनिष गवळी, हिरालाल कोथळकर, अजिंक्य वाघ, किरण कोथळकर, प्रकाश पवार, बाळासाहेब कोथळकर, लक्ष्मण मळेकर, यांच्यासह गावकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा