वसंत सुगावे पाटील यांच्या मागणीला यश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर)
घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँक व्हावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी मागील डिसेंबर2023 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून घुंगराळा येथे राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता आहे. बँक झाल्यास या भागातील शेतकरी, व्यापारी यांना कसा फायदा होईल याबाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले.
यावर अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दाखवत संबंधित विभागाला निर्देश दिले. मा.अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक *अनिल गचके* यांनी घुंगराळा येथे येऊन येथील शेतकरी, नागरिक,व्यापारी, सेवा सहकारी सोसायटी,ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांची भेट घेऊन बँक स्थापन करण्याबाबत आढावा घेतला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी बँक अधिकारी यांच्याकडे बँकेची शाखा होणे अत्यंत गरजेचे असून घुंगराळ्या सह वंजारवाडी, रुई,सावरखेड,राणसुगाव, निळेगव्हाण,गंगणबीड,हिप्परगा, या गावच्या विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी ,कर्मचारी कृष्णुर औद्योगिक वसाहातील उद्योजक, कामगार यांना ही या बँकेचा लाभ होईल त्यामुळे लवकरात आमच्या गावात राष्ट्रीयकृत बँक स्थापन करावी अशी मागणी बँक अधिकाऱ्यांसमोर केली.यावेळी ग्रामस्थांनी बँक अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला.
यावेळी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्याम यमलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा. ढगे,बालाजीराव मातावाड,गंगाधरराव बोधनकर, गंगाधर पांचाळ,माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे,विश्वनाथ सिद्धेवाड, तुकाराम कळकटवाड,खंडू पा.ढगे,रज्जाक शेख,राजेश ढगे,योगेश ढगे,रामचंद्र ढगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा