प्रत्येक वर्गातून दोन पालकांची नियुक्ती
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकवर्ग, विद्यार्थी, व पालक याचे आई वडील बोलवून बैठक घेऊन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. धावडा समतानगर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोलाईतसर यांनी विद्यार्थ्यांच्या आई वडील व पालकांना अगोदर निमंत्रण पत्रिका देऊन या शालेय व्यवस्थापन समितीची सूचना देऊन सर्वांना बोलावून सभा घेण्यात आली आहेत असुन प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांच्या आई वडील किंवा पालक यांची सर्वांना मते निवड करण्यात आली आहेत प्रत्येक वर्गातून दोन पालकांची नियुक्ती करून पुढील प्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करून त्यात सर्व जाती-धर्माचे सदस्य एससी, एसटी, ओपन, ओबीसी, असे सर्वांना प्राधान्य देण्यात आले आहेत
या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी धावडा येथील पत्रकार विठ्ठल भिका भोटकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत तर उपाध्यक्षपदी सौ रंजनाबाई शंकर धनवई यांची निवड करण्यात आली असुन उच्चश्रेणी शिक्षण प्रेमी शालेय मुख्याध्यापक गोलाईतसर यांची नियुक्ती तर शिक्षणप्रेमी म्हणून शांतीलाल खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच शालेय समितीचे सदस्य भरत शेनफड बोऱ्हाडे, शेख अश्रफ, शिवाजी भागाजी गवळी .समाधान विठोबा अपार, सौ.सुवर्णाबाई प्रविंण गायकवाड, रफिक तडवी, शिक्षक चोपडेसर, पाटीलसर, श्रीमती डहाके मॅडम, खर्चेसर, याच्यासह समितीत 13 सदस्यांची नियुक्त करून जिल्हा परिषद समतानगर शाळा धावडा येथे शालेय समिती स्थापन करण्यात आली आहे.
हि समितीची शांतेत बैठक पार पाडून मुख्यध्यापक शिक्षकांनी नवनियुक्त शालेय समिती अध्यक्ष धावडा येथिल पत्रकारविठ्ठल भिका भोटकर याच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा