राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख , सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ अमरावती अंतर्गत व नारायणराव नागरे महाविदयालय दुसरबिड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दत्तक ग्राम वर्दडी खुर्द / दुसरबिड येथे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, उन्नत 'भारत अभियान या अंतर्गत आज शिबिराचा शेवटचा दिवस म्हणजेच शिबिर समारोप या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. प्राचार्य डॉ राजेंद्र बोरसे (भगवान बाबा महाविद्यालय लोणार ) यांनी राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मा . प्रा. सौ. धनश्रीताई कायंदे ( संचालिका भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूम्हणा) या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अजून काही नवीन शिकलं पाहिजे व त्या शिकण्यातून स्वतःसाठी रोजगार म्हणून किमान आपल्या गरजा तरी भागवता आल्या पाहिजे असे सांगत.
विशेष श्रम संस्कार शिबीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा व्यवस्थापन परिषद सदस्य (सं गा बा अवि) प्राचार्य डॉक्टर विजय नागरे हे होते यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे गांधीजींच्या जन्म शताब्दी निमित्ताने या उपक्रमाचा उद्देश शिकलेल्या विद्यार्थ्यांनी खेड्याकडे जाऊन समाजाच्या गरजांचा अभ्यास करावा व त्या दृष्टीने आपली पावले असावी तसेच विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्य जोपासावी व ती समाजामध्ये कशी रुजेल याकडे त्यांनी लक्ष द्यावे हा या पाठीमागचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी आपल्या मनोगत भाषणातून व्यक्त केले यानंतर सात दिवसात विद्यार्थ्यांना जे अनुभव आले.
त्यापैकी स्वयंसेवक गलांडे स्वयंसेविका पूजा सानप आरती या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कीर्ती नागरे या विद्यार्थिनीने केले तसेच प्राध्यापक डॉक्टर दीपक देशमाने यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमाला सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मैना गवारे मॅडम, प्रा. गणेश घुगे, प्रा. सत्यम श्रीवास्तव ,प्रा. रोहिणी पेठकर, प्रा. तमन्ना शेख मॅडम, प्रा. मिलिंद गवई , इतर कार्यालयीन कर्मचारी अनिल रणमाळे ,अनिल गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते तसेच प्रा. एस.आर.वाघ कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा