कडकडीत बंद मुळे बाजारपेठात शुकशुकाट
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा वाई शहर व वाई तालुक्यात सर्वत्र बुधवारी सकाळपासुन व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नव्हती.मंगळवारी रात्री सोशल मिडीयावर वाई बंदच्या पोस्ट पडल्यामुळे बुधवारी सकाळपासुन व दिवसभर वाई शहरात व वाई तालुक्यात शुकशुकाट होता.सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्दयावर व सगेसोयरे या शासनाने काढलेल्या अधिसुचनेला कायद्यात रूपांतर करा
सर्वांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र ध्या तसेच आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याच्या शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी वाई शहर व वाई तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा