सलग दुसऱ्यांदा मिळाला आहे बॅंको पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेला अविज पब्लिकेशनतर्फे दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सलग दुसऱ्यांदा नागरी विभागातून राज्यस्तरीय बँको पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 14 शाखा कार्यरत असून सर्व शाखा संगणकीकृत आहे. या शाखांमधील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन प्रणालीनुसार सुरु आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ञ निवड समितीमार्फत झालेल्या पतसंस्थेच्या मुल्यांकनानुसार संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेची नागरी विभागातील बँको पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दमण येथे आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यातील सहकार क्षेत्रातील विविध विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली या पतसंस्थेला माजी सहकार आयुक्त श्री. मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणारा राज्यस्तरीय बँको पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बँकोचे संचालक श्री. अविनाश शिंत्रे, श्री. अशोक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार संत नामदेव पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनीलकुमार सिंह (सिन्हा), प्रशासकीय व्यवस्थापक श्री. निलेश लाखकर, कर्ज विभाग अधिकारी श्री. कल्याण देशमुख, श्री. बालाजी घ्यार, श्री. कडूजी कोरडे यांनी स्विकारला.
संत नामदेव पतसंस्थेच्या या यशामध्ये पतसंस्थेचे संचालक, सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल योगदान दिले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संत नामदेव पतसंस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा