टायर जाळून संताप व्यक्त
शिवशाही वृत्तसेवा,धर्माबाद जिल्हा प्रतिनिधी, नारायण सोनटक्के
आरक्षण योद्धा मनोज पा.जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धर्माबाद शहर सकल मराठा समाजाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवीत व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे.
आणि विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी धर्माबाद व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून जरांगेना जाहीर पांठीबा दिला.
सकाळी दहा वाजता शहरातील बाजारपेठ बंद करून शहरातील शिवाजी चौकात
आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला.
मराठाबांधवांनी येथील तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सध्या शालेय परीक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू ठेवण्यात आल्या व शहरातील दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्वच दुकाने दिवसभर बंद होती.त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.
या दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा