सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सेनगाव तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.
ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन चर्चा केली व गुन्हे मागे घेण्यात आले पाहिजे अशी मागणी पोलीस सहायक निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्फत वरीष्ठ अधिकारी तसेच मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, यांच्याकडे मागणी केली आहे.
गेले चार ते पाच महिन्यापासून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही सरसकट ओबीसी वर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलने उपोषणे सुरूच असून काल दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही जवळपास 40 ते 45 ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला .सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात हे रास्ता रोको केले होते ओबीसी वर्गातून मराठा समाजाला आरक्षण व सगेसोयरे आदेश तात्काळ शासनाने जारी करावा अशा मागण्या करत जिल्हाभरात विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर गाव पातळीवर आंदोलन रास्ता रोको करण्यात आला होता त्या आंदोलनात प्रशासनाने रास्ता रोको करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत जिल्हा अधिकारी महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलन कर्त्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनास कळविले आहे .
या निवेदनावर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सकल मराठा समाजाला मार्गदर्शन केले निवेदनावर यांच्या सह अनेक सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा