maharashtra day, workers day, shivshahi news,

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

कार्यक्रमांतर्गत ग्राम बाल संरक्षण समितीचे पुन:र्गठन
Village Child Protection Committee meeting concluded , Hingoli , Kalmanuri , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली), दि. 02 :   कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत ग्राम बाल संरक्षण समितीचे पुन:र्गठन करुन या समितीत नव्याने 20 ते 30 वयोगटातील बाल मित्र निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली . 
या बैठकीत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्या समस्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात आली . ग्राम बाल संरक्षण समितीचे रचना फलक ग्राम पंचायत कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना व बालविवाह प्रतिबंध अधिनियम,2006 याबाबत सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे व चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली. 
यावेळी रेडगाव येथील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक प्रकाश रणवीर, ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव तथा अंगणवाडी सेविका अरुणा शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव सवंडकर, आशा वर्कर जयश्री हनवंते, पंचायत समिती सदस्य मारोती पवार, ग्रामपंचायत कर्मचारी चक्रधर सवंडकर, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर राजरत्न पाईकराव तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !