'ना नफा ना तोटा' या तत्वावर अंढेरासह परिसरातील रुग्ण सेवेसाठी उपलब्ध
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
तालुक्यातील अंढेरा, स्थानिक औंढेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला सहकार खात्यात यशस्वीपणे एकवीस वर्ष पूर्ण झाल्याने संचालक मंडळाने नवीन वर्षी परिसरातील गोर गरीब जनतेसाठी एक नवीन रुग्ण वाहिका 'ना नफा ना तोटा' या तत्वावर अंढेरासह परिसरातील रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव सानप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती समाधान पाटील शिंगणे, उपसभापती दादाराव खार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंढे, संस्थापक अध्यक्ष भगवानराव सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी फित कापून केले. यावेळी नियमित खातेदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक भास्करराव तेजणकर यांनी तर सुत्रसंचालन विष्णू बनकर यांनी केले. यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष गजानन नागरे, संचालक उमेश दंडे, संजय गायकवाड, रमेश इंगळे, शेख रफिक शेख शरीफ, सुभाष राठोड, मोतीराम बडगे, संचालिका मिना सानप, रुख्मिणी तेजणकर उपस्थित होत्या. यावेळी विषय इंगळे लिपिक, रोखपाल सतिश सानप, अल्प बचत प्रतिनिधी गोपाल दळवी आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा