ओझर्डे गावावर शोककळा पसरली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुलदीप चंदरराव पिसाळ देशमुख वय ६० वर्ष राहणार ओझर्डे ता.वाई यांचे दि.४ रोजी दुपारच्या सुमारास पुणे येथील राहत्या घरीच अचानक निधन झाल्याने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
गावा मध्ये कुलदीप यांच्या निधनाची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने गावातील घरा घरा मधुन हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलदीप हे शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे आणि सतत स्वताच्या हसऱ्या चेहर्याने रस्त्यावर चालत असताना भेटेल त्याची आस्थेने चौकशी करणारे होते. कोणीही त्यांना कसलीही अडचण सांगितली तर त्यावर ते तात्काळ मार्ग काढुन समोरच्याचे समाधान करण्यात पटाईत होते .
त्यामुळे त्यांचा ओझर्डे गावासह फलटण येथे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांचे व्यत्तिमत्त्व हे नाव लौकिक प्राप्त होते. पण अशा सुसंस्कृत कुलदीपवर काळाने अचानक झडप घातल्याने त्यांचे नातेवाईक, आणि मित्र परिवार क्षणार्धात शोकसागरात बुडाला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, असा परिवार आहे .
त्यांच्यावर ओझर्डे सोनेश्वर येथील कृष्णनदी काठावर असणाऱ्या स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार समयी सामाजिक, शैक्षणीक, सहकार, राजकीय, व मित्र परिवारातील मान्यवर व नातेवाईक यांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा