रोडवरील गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून झाला होता वाद
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
हॉटेलच्या बाहेर रोडमध्ये लावलेल्या गाड्या ड्रायव्हरला बाजुला काढण्यास सांगणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर हॉटेल मालकाने हल्ला केल्याची घटना पहाटे 1 च्या सुमारास मरवडे गावाच्या जवळ असलेल्या महाराजा हॉटेल समोर घडली आहे.
याप्रकरणी 1) बंदेनवाज गफुर मुजावर 2) सौरभ अशोक शिवशरण 3) तौसीफ नसीर मुजावर 4) तैहराबी बंदेनवाज मुजावर 5) नगीना समीर मुजावर 6) जमीर बंदेनवाज मुजावर 7) समीर बंदेनवाज मुजावर 8) करीबनवाज राजमहमद मुजावर सर्व (रा.मरवडे ता मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, दि.8 फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश विठोबा वाघमोडे साहेब यांना चेकींग रात्रगस्त असल्याने फिर्यादी पोलीस अंमलदार हे रवाना झाले होते.
लोकसभा निवडणुक 2024 अनुशंगाने मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील आंतरराज्य चेक पोस्ट कात्राळ या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांना चेक करणे कामी जात असतानाआज दि.9 फेब्रुवारी रोजी 1 वाजताच्या सुमारास मरवडे गावाच्या जवळ असलेल्या महाराजा हॉटेल समोर रोडवर दोन मोठी वाहने थांबलेली होती. त्यावेळी फिर्यादी पोलीस अंमलदार सोबत असलेले चेकींग अधिकारी यांनी सदर वाहनाचे चालकास वाहने रोडच्या बाजुला लावण्यासाठी आवाज दिला असता कोणीही वाहनामध्ये नसल्याने चेकींग अधिकारी यांनी महाराजा हॉटेलचे मालक यांना आवाज देवुन बोलाविले.
त्यावेळी आमच्याकडे एक व्यक्ती आला त्याला साहेबांनी त्याचे नाव विचारले असता त्यांने त्याचे नाव सौरभ शिवशरण असे असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यास सदर रस्त्याच्या मध्ये लावलेल्या गाड्या कोणाच्या आहेत. त्या रस्त्याच्या बाजुला लावण्यास सांगा. व हॉटेलचा मालक कोण आहे. त्याला इकडे बोलावा, तेवढ्यात समीर मुजावर हा तेथे आला.
तो सपोनि वाघमोडे साहेब यांना म्हणाला की, मिच हॉटेलचा मालक आहे. काय झाले बोला. त्यावेळी सपोनि वाघमोडे साहेब म्हणाले की, रोडमध्ये लावलेल्या गाड्या ड्रायव्हरला बाजुला काढण्यास सांगा. त्यावेळी समीर मुजावर म्हणाला की, आम्ही वाहने बाजुला काढत नाही. तुम्ही येथुन चालते व्हा. तुमचा काय संबंध आहे.तेव्हा सपोनि वाघमोडे साहेब यांनी तुम्ही अद्याप पर्यंत हॉटेल चालु कसे काय ठेवले असे म्हणाले असता त्याचा समीर मुजावर यास राग आल्याने त्याने वाघमोडे साहेबांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही दोघेजण गाडीच्या खाली उतरलो.
समीर मुजावर हा आमचे सोबत वाद घालु लागल्याने आम्ही त्यास गाडीमध्ये बसवत असताना सौरभ शिवशरण यांने हॉटेल मधील इतर लोकांना आवाज देवुन बोलाविले. त्यावेळी हॉटेलमधील सर्व लोक लाट्या काट्यासह आमच्या जवळ येवुन त्यांनी आम्हाला मारहान करण्यास सुरुवात केलीत्यांवेळी 1) बंदेनवाज गफुर मुजावर यांने फिर्यादी पोलीस अंमलदार यास जवळ येवुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली 2) सौरभ अशोक शिवशरण यांने त्यांच्या हातातील काठीने फिर्यादी पोलीस अंमलदार यास उजव्या कानाच्या वरच्या बाजुस मारले. त्यांच्या सोबत असलेल्या 3) तौसीफ नसीर मुजावर यांने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी पोलीस अंमलदार यास हाता, पायावर मुक्का मार दिला आहे.
तसेच 4) तैहराबी बंदेनवाज मुजावर हिने फिर्यादी पोलीस अंमलदार यास उजव्या हाताच्या दंडावर चावा घेतल्याने गंभीर जखम झालेली आहे. व 5) नगीना समीर मुजावर हिने हाताने व ऊसाच्या दांडक्याने मारहाण केली आहे. त्यावेळी सपोनी वाघमोडे साहेब यांना 6) जमीर बंदेनवाज मुजावर 7) समीर बंदेनवाज मुजावर 8) करीबनवाज राजमहमद मुजावर यांनी त्यांच्या अंगावरील सरकारी गणवेष फाडुन काठीने व लाथाबुक्याने उजव्या हातावर, डोकीत उजव्या बाजुस व गुडघ्याच्या खालच्या बाजुला मारलेतसेच बंदेनवाज गफुर मुजावर यांनी त्याच्या हातातील काठीने सपोनि वाघमोडे साहेब यांना मारहाण केली आहे. तसेच फिर्यादी पोलीस अंमलदार मोबाईल मध्ये व्हिडीओ रेकॉडींग करण्यासाठी त्यांचा मोबाईल बाहेर काढला असता
फिर्यादी पोलीस अंमलदार जवळील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला व सरकारी वाहनाची चावी बंदेनवाज गफुर मुजावर यांनी काढुन घेतली आहे. यातील वरील सर्व लोकांनी आम्ही करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणुन गैर कायद्याची मंडळी जमवुन जबर दुखापत केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाणे भाग 5 गुरनं 99 /2024 भादवी कलम 353, 332, 333, 323, 324, 504, 143, 147, 148, 149, महा पोलीस अधि. कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा