फत्तेपुर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञान चोरट्यांवर गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव (तालुका प्रतिनिधी रईस शेख)
जामनेर - तालुक्यातील तोरणाळे येथील रहिवासी शालिग्राम त्रंबक पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पुण्याला असलेल्या मुलाकडे राहायचे. परंतु दोन तीन महिन्यातुन घरी येत असत. त्याप्रमाणे शिक्षक घरी येताच त्यांना आपल्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले त्यानंतर त्यांनी घरामध्ये गेल्यावर त्यांचे देवघर, टिव्ही शोकेश, गोदरेज कपाटामध्ये असलेले मौल्यवान वस्तू, सोन्याची अंगठी, सेवन पिस, रोक रक्कम असे आदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लाबवल्याचे निर्दशनास आले.
त्यांनी तात्काळ फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या सर्व प्रकार लक्षात घेतला. बीट अमलदार दिनेश मारवडकर व जवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हनुमान मंदिराची दानपेटी, देऊळगाव व पळसखेडा काकर येथील शेतकऱ्याचे ठिबक, गाय, बैल, मोटरसायकल, एवढेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल सुद्धा चोरीस गेलेले आहेत. आजपर्यंत या अज्ञात चोरांच्या मुसक्या मात्र आवळल्या गेल्या नाहीत. जर असेच गावागावात जनतेचा मौल्यवान वस्तू व शेतकऱ्यांचा शेतमाल चोरीला जात असेल तर शेतकऱ्यांनी व जनतेने करावे तरी काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण परिसरामध्ये चोरांची दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून व शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा