जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली- येथे दि.१२फेब्रुवारी सोमवार रोजी २२ व्या धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मपरिषदेत विविध नामवंत भंतेजी उपस्थित राहून धम्मदेसना देणार आहेत. ,रात्री भीम व बुद्ध प्रेरणा गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ.भदंत उपगुप्त महास्थवीर,भंते पञ्ञारतन थेरो यांनी केले आहे.
हिंगोली येथील कालकथीत भंते काश्यप महाथेरो यांनी सुरू केलेल्या अकोला बायपास जवळील शांतीनगर बळसोंड शिवारातील जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्राच्या वतीने यंदा २२व्या ऐक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन दि.१२फेब्रुवारी सोमवार रोजी कै. अमृतलाल बगडीया नगरी मध्ये करण्यात आले आहे. परिषदेनिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहण भिकूसंघा च्या हस्ते होणार आहे,त्यानंतर दुपारी १ वाजता भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली धम्मपरिषदेला प्रारंभ होईल.उद्घाटन डॉ.भदंत उपगुप्त यांच्या हस्ते होणार आहे.
परिषदेस विविध ठिकाणच्या नामवंत भंत्तेजींची धम्मदेसना होणार आहे. त्यामध्ये प्रा.डॉ.खेमधमो महाथेरो, भंत्ते शरणानंद महाथेरो,भंते प्रा. सत्यपाल महाथेरो, भंते डॉ.इंदवस महाथेरो,भंते विनयबौधी प्रिय थेरो, भंते करूणानंद थेरो,भंते पय्यातिस थैरो, भंते ज्ञानरक्षित थेरो,भंते धम्मबोधी थेरो,भंते धम्मानंद थेरो, भंते महाविरो थेरो,भंते मुदीतानंद थेरो,भंते पंय्याबोधी थेरो,भंते अस्सजी थेरो, भंते प्रज्ञापाल थेरो,भंते पय्यानंद थेरो, भंते धम्मशील थेरो, भंते शिलरत्न थेरो, भंते सुभुती थेरो,भंते संघपाल थेरो, भंते बोधिधम्मा, भंते रेवतबोधी,भंते संघप्रिय,भंते पय्यावंस ,भंते बुद्धभूषण अदिसह उपस्थित भिक्खू संघ धम्मदेशना देणार आहे.
परिषदेसाठी महाउपासक डॉ.एस.पी.गायकवाड याच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार खासदार,जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. रात्री बुद्ध-भिम प्रेरण गितांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या धम्मपरिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भंते पंचरतन थेरो व धम्म परिषद संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा