maharashtra day, workers day, shivshahi news,

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत नायगाव मतदारसंघामध्ये गाव चलो अभियान यशस्वी

गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयापासून सुरुवात
Gaon Chalo Campaign , Gajanan Patil Chavan , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
दिनांक 09/02/2024 रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व व अग्रेसर पणे सामाजिक भूमिका जोपासणारे गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या सूचनेनुसार 'गाव चलो अभियान' संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत दिनांक 9 दोन 2024  रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघातील  नायगाव शहरासह  नागरिकांच्या घरी भेटी देऊन मोदीजींनी गरीब कल्याण या एकमेव उद्दिष्ट घेऊन केलेल्या विविध जनहितार्थ कामाची माहिती तसेच सर्व लाभधारकांचे विविध अडीअडचणी जाणून घेत सोडवणायचे काम लक्षत घेण्यात आले 
 तसेच शहरातील मुख्य रस्त्याने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधून मोदी सरकार करत असलेल्या माहितीचे पत्रक दिले. यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. या अभियानामध्ये नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद देत होते. त्यामुळे नायगाव शहर हे भगवेमय झाले होते कार्यकर्त्यांनी दस्ती टोपी घालून नायगाव शहरांमध्ये पदयात्रा काढली. 
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट साध्य करताना "बलशाली भारताचे स्वप्न सत्यात उतरवणारे, आदरणीय पंतप्रधान मोदींजींनी आजवर समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेकडो योजना राबविल्या या मध्ये पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, उज्वला गॅस योजना लाभार्थी, शेतकरी अनुदान लाभार्थी, स्वछता लाभार्थी, केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना जसे एन.आर.सी. 370 A, कलम,  सुरक्षा, राम मंदिराची निर्मिती, कोरोना कोव्हिड 19, काळातील कार्य अश्या अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची भेट आसाम सीमेवर कार्यरत असलेल्या जवान पिंजारी कुटुंबीयाशी संवाद साधून खा.चिखलीकर यांनी  त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी हे कुटुंब भारावून गेले होते यावेळी जवानांच्या विषयी मोदी सरकार करत असलेल्या कामांची माहितीची चर्चा केली गाव चलो अभियान नायगाव शहर येथे बूथ क्रमांक 266,267, 268, 269,271 येथील नागरिकांशी संवाद त्याचबरोबर शहरातील मद्रेवार फॅमिली शॉप, चिद्रावार कापड दुकान, पृथ्वी कलेक्शन, हेडगेवार चौकातील हातगाडीवाले भाजीपाला विक्रेते यांना मोदी सरकारने करत असलेल्या कामांची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष जाऊन दिली त्याचबरोबर काम करणाऱ्या मुनीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शहरात फिरत असताना महिलांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या औक्षण करून स्वागत केले. जोरदार फटाक्याची आतिश बाजी करून नायगाव शहर दुमदुमून टाकले.
नायगाव शहरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते बालाजी बच्चेवार, माजी शिक्षण सभापती श्री शिवराज पाटील होटाळकर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गंगाधरराव जोशी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश कुंटूरकर, भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, भारतीय जनता पार्टीचे  धनराज शिरोळे, भाजपा जिल्हा चिटणीस विशाल पाटील शिंदे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील बेंद्रीकर, साहेबराव पाटील पवार, प्रभाकर पाटील मोरे अंचोलीकर, शंकर कल्याण संभाजी पोटफोडे, प्रदीप देमेवार, चंद्रकांत चव्हाण, गणेश पवळे, रविकांत पवळे, शिवाजी पाटील ढगे, लालवंडीचे माजी सरपंच भगवानराव लंगडापुरे, पळसगावचे माजी सरपंच शिवाजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील चव्हाण, नावंदीचे माजी सरपंच महेश देशपांडे, खैरगावचे माजी सरपंच कुमुद पटेल, राघोबा  चव्हाण, शिवाजी वडपत्रे, गुरुनाथ पाटील शिंदे, नागेश वडपत्रे, नरसीचे माजी सरपंच कोकणे, विनायकराव  गोळेगावकर, भाऊराव पाटील चव्हाण, करीम चाऊस, सय्यद मुल्ला, अंतरगावचे सरपंच गजानन पाटील तोडे, विनायक चव्हाण, बालाजी तळणीकर, शंकर वडपत्रे, किशोर महाराज धर्माबादकर, माधव चव्हाण, माधव वरणे, साहेबरावज गायकवाड लगुळकर, माधव कुडके, नारायण महाराज वडजे, बळवंत पाटील शिंदे आंतरगावकर, मुगावचे माजी सरपंच गंगाजी पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शहरातील व परिसरातील भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
विशेष म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नायगाव शहरातील विकास कामासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली, तसेच या महत्वपूर्ण घर चलो गाव चलो अभियाना मध्ये नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक, राजकीय, कामगार, मजदूर, शेतकरी, व्यापारी बांधव, मोठ्या प्रमाणात सहभाग होता  आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !