गोपु पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती मोहत्सव समितीने आयोजित केलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे रविवारी (ता.११) असोसिएशनचे अध्यक्ष गोपु पाटील, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली व हाॅलीबाॅल असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन शिवजयंती मोहत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. रविवार पासून मोहत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून क्रीडा प्रेमींना, रसिकांना मेजवानी मिळणार आहे. शिवजयंती पर्यन्त भरगच्च कार्यक्रम सुरू राहणार आहेत. रविवारी हॉलिबाल स्पर्धेने शिवजयंती मोहत्सवाला सुरुवात झाली.
यावेळी समिती अध्यक्ष ऍड.रमेश शिंदे, सचिव पवन जाधव, आयोजक उमेश गुठ्ठे, समिती मार्गदर्शक मनोज आखरे, कल्याण देशमुख, समिती पदाधिकारी सुरज वडकूते, सुजय देशमुख, ऍड. भाकरे, सचिन जाधव , समिती सदस्य, खेळाडू व क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा