दुसरबीड येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
दुसरबीड येथे भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पाटींचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी मंचावर ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार तोताराम कायंदे, नितीन देशमुख, गणेश राजेजाधव, शिवाजी खरात, भाजपा तालुकाध्यक्ष आत्माराम शेळके, सुभाष धिके, विष्णू मेहत्रे, उल्हासराव देशपांडे, लक्ष्मणराव वाघ, शिवराज कायंदे, गजानन घुले, श्रीकृष्ण तौर, माजी सरपंच प्रकाश सांगळे, पांडुरंग जायभाये, शंकर तलबे, माजी सरपंच छगन खंदारे, एकनाथ सांगळे, रामप्रसाद कुटे, अंबादास जायभाये, प्रकाश गिते, गोविंद जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि आमच्या नेत्या पंकजा मुंढे यांचे विचार व देशहितासाठी घेतलेले निर्णय आणि योजना सामान्यांना पर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांचा संपर्क ठेवण्यासाठी तसेच महाराष्ट्र सरकार यांचे विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व प्रत्येक शेतकरी शेतमजूर माणसासाठी मी वेळ देणार आहे.असे सांगितले.
यावेळी शेख जावेद, बाळासाहेब केळकर, कृष्णा काळे, संदिप मेहने, अनिल काकडे, संतोष पवार, समाधान घुगे, राजु पवार, उत्तमराव उबाळे, सुंदर आढाव, सुरेश बुलकडे, गजानन वायाळ, पंडित सानप, संतोष डोईफोडे, श्रीराम मुंढे, माजी सरपंच अमजद शेख, विठ्ठल राठोड, दिपक घुगे, माजी सरपंच प्रल्हाद नागरे, गजानन घुगे, हाशम कुरेशी, कासम शेख, दत्ता सानप, अजहर शेख, श्रीकांत सानप, गोपाल जाधव, अजय मोहिते, शिवराम मुदमाळी, गजानन सोनुने, नाजीम कुरेशी, गजानन ताठे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा