संसदेत प्रश्न मांडल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा व कृषी सचिवांची घेतली भेट
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्ह्यातील ४ लक्ष ६१ हजार शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम तात्काळ दिली जावी. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी (दि.८) संसदेच्या लोकसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. शुक्रवारी (दि.९) त्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचा परतावा मिळावा यासाठी लेखी निवेदन दिले.
त्यांच्या या मागणीची दखल घेत शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यासाठीच्या हालचालींना वेग आले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील हंगामासाठी एकूण ४ लक्ष ६१ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. दरम्यान अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन. उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याची, परंतु विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा करून केंद्र व राज्य शासनाकडे अपील केली. जिल्ह्यातील उत्पादकता सर्वसाधारण असल्याचा निर्वाळा देत पिक विमा फेटाळून लावला.
यामध्ये विमा कंपनी आणि कृषी विभागाचा हलगर्जी मुळे अजूनही शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला नसल्याने खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी सदनात हा मुंद्दा उचलुन धरला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभाग्रहाचे लक्ष वेधले आणि केंद्र सरकारच्या कृषी विभागाने यामध्ये प्राधान्याने लक्ष घालून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पिक वीमा दिला जावा अशी केंद्रीय कृषी मंत्री व सचिव यांच्याकडे मागणी केली.
जिल्ह्यातील ४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विमा जमा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने कळविण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा