शिवविचार पिठावर यंदा तिन दिवस कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शिवजन्मोत्सव मोठया थाटात संपन्न होणार आहे. आजपासुन शिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या क्रीडांगणावर व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. यंदा शिवविचार पिठावर तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्स समिती हिंगोलीद्वारा शिवजन्मोत्सवा निमित्त दि.११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या क्रिडांगण परिसरात व्हॉलीबॉल स्पर्धा. दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता लॉन टेनिस स्पर्धा स्व.ऍड.पंडितराव देशमुख क्रीडासंकुल अकोला रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. दि.१३ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांवरील ऐतिहासिक छायाचित्रांवर विद्यार्थ्यांना माहिती सादरीकरण करण्यात येणार आहे.
दि.१५ फेब्रुवारी रोजी बॅडमिंटन स्पर्धा दुपारी २ वाजता आदर्श महाविद्यालय क्रीडा संकुल येथे होणार आहे. दि.१७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धा, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर दि.१७ रोजी सायंकाळी ६ वाजता कवि संमेलन होणार आहे. तसेच दि.१८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकाळी ९ वाजता नृत्य, समुह नृत्य, अभिनय, वेशभुषा व गायन स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता भव्य दिपोत्सव व त्यानंतर सायं.७ वाजता मरळक जि.नांदेड शिवशक्ती गायन संचाचे शिव पोवाडे कार्यक्रम होणार आहे.
शिवजन्मोत्सवाच्या दिवशी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता शिवअभिषेक, सकाळी ७ वाजता ध्वजारोहन त्यानंतर ८ वाजता शिवपाळणा, शिवपुजन व शिवगजर होणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासुन भव्य मोटार सायकल रॅली निघणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ व १०.३० वाजता भव्य मिरवणुक व शोभा यात्रा, दुपारी ४ वाजता पुतळा परिसरात शिवछत्रपती गौरव पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ६ वा. भव्य अतिषबाजी व दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन सायंकाळी ७ वाजता शिव गितांचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येने शिवप्रेमी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व मार्गदर्शन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा