maharashtra day, workers day, shivshahi news,

राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन

महामार्गावर टायर जाळून चक्का जाम  

Maratha Andalan for reservation , Wheel jam on the highway due to tire burning , buldhana , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, बूलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे
मराठा समाजाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपाेषण सुरू केले आहे़. या उपाेषणाकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने राहेरी बु येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर २४ फेब्रुवारी राेजी टायर जाळून चक्का जाम आंदाेलन करण्यात आले़.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता़. यावेळी गावातील सरपंच सुभाष देशमुख, मदन देशमुख, भगवान देशमुख, विठ्ठल देशमुख, विनायक देशमुख, बालाजी देशमुख, धनंजय देशमुख, प्रदीप देशमुख, प्रमोद देशमुख, सुभाष देशमुख, राजकुमार देशमुख, प्रकाश मोरे, बंडू मोरे, गजानन देशमुख, विलास देशमुख, विनायक पाटील, हसन देशमुख, हरीभाऊ देशमुख, विजय देशमुख, अंकुश देशमुख, सुरेश देशमुख, राजेंद्र देशमुख, संभाजी राजे, संतोष देशमुख, संदीप देशमुख, उल्हास देशमुख, रोशन देशमुख, भरत देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, मनोहर देशमुख, संजय देशमुख, सतीश देशमुख, संभाजी मोरे, भूषण देशमुख आदींसह इतरांनी सहभाग घेतला़ यावेळी किनगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता़
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !