पंढरपूरकरांनी घेतला विविध कलाप्रकारांचा आस्वाद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
लोकनेते स्वर्गीय भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा च्या वतीने भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असे चार दिवस हे प्रदर्शन सुरू होते. महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पार पडला. अतिशय बहारदार पारंपारिक गीत नृत्यातून महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील कलाकारांनी उलगडून दाखवली.
महाराष्ट्र गीत, जात्यावरच्या ओव्या, वासुदेव, पोतराज, वारकरी दिंडी, लावणी, पोवाडा, अशा महाराष्ट्राच्या विविध कलाप्रकार व संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. कार्यक्रमात सादर झालेल्या विविध कलाप्रकारांना पंढरपूरकर रसिकांनीही उस्फुर्त दाद दिली.
भारत कृषी महोत्सवाचे संयोजक भगीरथ भालके, लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांच्यासह भालके गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि पंढरपूरकर रसिकांनी भारत कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाला उपस्थित राहून मराठी संस्कृती आणि विविध लोककला प्रकारांचा आस्वाद घेतला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा