शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वारंवार प्रसिद्धीसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतात. पण मी म्हणतो तुम्हीच राजीनामा द्या मी ठाण्यामध्ये उभा राहतो. आणि माझं आदित्य ठाकरेंना आव्हान आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मला निष्क्रिय समजत असतील तर आदित्य ठाकरेंना बुलढाण्यामध्ये लढावावं, असे ओपन चॅलेंज शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहे. बुलढाणा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी खासदार जाधव निष्क्रिय असल्याची टीका केली होती. त्याला जाधव यांनी प्रत्युत्तर दिलय.
aaaa
उद्धव ठाकरे जर मला निष्क्रिय समजत असतील तर...
प्रतापराव जाधव म्हणाले, हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंना माझ्या विरोधात लढवा. इतलासा आदित्य ठाकरे वारंवार प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्र्यांना आमच्या चॅलेंज देतो. राजीनामा द्या,मी ठाण्यामध्ये उभा राहतो, असं म्हणतो. माझं त्या आदित्य ठाकरेला आव्हान आहे. उद्धव ठाकरे जर मला निष्क्रिय समजत असतील तर आदित्य ठाकरेंना बुलढाण्यामध्ये लढावावं..मी त्याच्या विरोधामध्ये लढायला तयार आहे.
aaaa
घराघरांमध्ये शाखा आणि घराघरांमध्ये शिवसैनिक तयार करण्याचे काम मी केले
पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, विदर्भातून उद्धव साहेबांच्या नेतृत्वात 4 आमदार निवडून येत होते. त्यातले 2 -2 आमदार मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्याची शिवसेना मी मजबूत केली. घराघरांमध्ये शाखा आणि घराघरांमध्ये शिवसैनिक तयार करण्याचे काम मी केले. उद्धव साहेब आता विरोधात गेले म्हणून म्हणत असतील. पण मागच्या वेळेस मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्हाला कोणता उमेदवार माझ्याबरोबर उतरायचा आहे ते उतरवा. नाहीतर आदित्य ठाकरे याला उमेदवारी द्या, असेही जाधव यांनी स्पष्ट केली.
aaaa
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
इथले गद्दार खासदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, त्यांचा चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील भाषणातून केली होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा