maharashtra day, workers day, shivshahi news,

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात १ ठार २ जखमी

चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक झाला पलटी
Fatal accident on Samriddhi Highway , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
 मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन त्याला अचानक आग लागल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलो आहे. ही घटना मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असलेल्या चायगाव गावाजवळ मुंबई कॉरिडोर मधील चॅनेल नंबर 290 जवळ आज सकाळच्या सुमारास घडली आहे. 
या बाबत अधिक माहिती नुसार अज्ञात नंम्बरचा टूक हा समृद्धि महामागनि नागपुर वरुन मुंबई कडे चालला होता सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असणाऱ्या चैनल नंम्बर २९० जवळ महामार्गाच्या कठड्याला तोडून रस्त्याच्या खाली पल्टी झाला ट्रक पलटी होताच त्यामध्ये अचानक आग लागली यावेळी ट्रकमध्ये तीन जण अडकले होते अपघाताची माहिती मिळताच समृद्धि वरील जलद कृती दल, ॲम्बुलन्स अग्निशामक दलाचे वाहन, पोलिस त्याठिकाणी पोहोचले त्यांनी तत्काळ ट्रकची आग विझवुन आत मध्ये अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले ट्रक मधील एजाज शाह वय 20 वर्ष रा. उत्तर प्रदेश यांचा गंभीररित्या जळाल्यामुळे जागीच मृत्यु झाला होता तर शकील शाह वय 35 व शोएब अली वय 15 हे दोघे जण आगिने भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले गंभीर जखमीना पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती केल्याची माहिती मिळाली असून मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठविन्यात आले आहे. 
या वेळी १०८ एम्बुलैंस चे डॉ. अशोक पिसे पायलट प्रदीप पडघान व भगवान राठोड़ तसेच समृद्धि महामार्ग पोलिस व जलद कृती दलाने तत्काळ अपघातग्रस्त ठिकाणी पोहचत मदत केली.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !