मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अभियान !
शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
!मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अभियान !
या उपक्रमात माझी शाळा जिल्हा परिषदशाळातून.जि.प.प्रा.शा. अंचोली,ता-नायगाव तालुक्यातून सर्वप्रथम येऊन तीन लाख बक्षीस पात्र ठरली. या स्पर्धेतून आम्ही खूप काही शिकलो. अनेक लोकं अनुभवली.अनुभवत आहोत.स्पर्धेचा आम्ही आनंद लुटला. प्रत्येक ठिकाणी आमच्या लेकरांना एक नवा अनुभव मिळत गेला. *स्पर्धा ही केवळ क्रमांक मिळविण्यासाठी नसते तर अनुभवाची शिदोरी मिळविण्यासाठी असते. या उपक्रमातून आम्ही नवा पाठ घेतला. या स्पर्धेतील उपक्रम खूपच आनंददायी होते. शालेय परिसर सजावट, शालेय रंगरंगोटी, परसबाग, विद्यार्थ्यांची बचत बँक, आरोग्यदायी शिबिरे, शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध शालेय क्रीडा स्पर्धा, स्काऊट गाईड मेळाव्यातील सहभाग, स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोन, मेरी माटी मेरा देश, माजी विद्यार्थी मेळाव्याने तर धमालच केली. प्रत्यक्ष लेझीम खेळण्याचा माजी विद्यार्थ्यांनी बालपणीचा आनंद घेतला. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गावातील माजी विद्यार्थ्यांनीही या उपक्रमास शुभेच्छा देऊन आमचा आनंद द्विगुणीत केला.
या उपक्रमातील सहभाग, यासारख्या विविध उपक्रमाची प्रत्यक्ष शाळेमध्ये नियोजन आणि आयोजन करून सादरीकरण केले तेव्हा खूप आनंद घेता आला. सुंदर अशी प्रशस्त इमारत, रंगरंगोटी आणि डिजिटल शाळा म्हणून प्रत्येक वर्गात विद्युतीकरण, टीव्ही, कम्प्युटर अशा भौतिक सुविधा उपलब्ध असणारी शाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धनासाठी सज्ज आहे.
खरंच मला आभार मानावे वाटतात ते माननीय पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे साहेबांचे व त्यांच्या टीमचे. कारण कुठलाही दबावाखाली न येता माझ्या शाळेचे उपक्रम पाहून त्यांनी आम्हास निःपक्षपातीपणे गुणदान दिले. आणि कार्य करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. आमच्या या यशामध्ये आमच्या ग्रामपंचायत कार्यालय अंचोली चाही मोलाचा वाटा आहे. त्यांनी इमारतीसह अनेक भौतिक सुविधा आम्हास उपलब्ध करून दिल्या त्यांचेही खूप खूप आभार! तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व व्यवस्थापन समिती
गावातील अनेक हात आमच्या मदतीला धावले.जणू काही या स्पर्धेत गावकरीही सहभागी होते की काय असं वाटायला लागलं होतं.आपल्या शाळेबद्दल असणारी आस्था यातून लक्षात आली. या उपक्रमाच्या निमित्ताने आमचे चिमुकले ही खूप धावले. शालेय स्वच्छते पासून परिसर स्वच्छता आणि विविध उपक्रमातील सहभागातून त्यांना खूप अनुभव देवुन गेला.यासोबत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं हेही आम्ही विसरू शकत नाहीत.आमच्या सर्व सहकारी बांधवांची एकजूट आणि कल्पकता या स्पर्धेत खूप मोलाची ठरली.
माझ्या कोलंबी केंद्राचे केंद्रप्रमुख चिखलवाड सर व केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक बंधवांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन करून आमच्या सोबत धिरोदत्त पणे उभे राहून काम करण्यासाठी पाठबळ दिले. त्यांच्याही सदिच्छा मी विसरू शकत नाही. आमच्या केंद्राचे मी शतशः ऋणी आहे.
आपल्याला आजुन खूप काही करणे गरजेचे आहे.
कारण जिल्हा परिषदेच्या शाळा धोक्यात आलेल्या आहेत त्या टिकवण्याचं कार्य आपल्यासारख्या अनेक शिक्षक बांधवांनी करणे गरजेचे आहे. स्पर्धा ही निमित्त आहे मात्र आपल्यापुढे वेळोवेळी अनेक स्पर्धांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यातून जिंकून अजिंक्य होणे गरजेचे आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा