कासेगावचे महत्त्व सांगत पुरातन इतिहासाची आठवण करून दिली
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवव्याख्यानमालेचे कासेगाव येथे आयोजन करण्यात आले होते..
या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.श्री.नितीन पाटील बानगुडे यांच्या व्याख्यानातून समर्पित करण्यात आले. त्यांच्या अस्खलित वाणीतून शिवचरित्राचा धगधगता इतिहास ऐकताना डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहरा अशी हजारो श्रोत्यांची स्थिती होती..
'छत्रपती शिवाजी महाराज' हे केवळ नाव नसून आदर्श राज्यकारभाराचा महामंत्र आहे. राजा छत्रसाल असो किंवा राजा ओहम छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतलेले असंख्य व्यक्तिमत्व भारतात आहेत. बलाढ्य मुघल सत्तेला पराभूतच नव्हे तर आपल्या गनिमी काव्यातून छत्रपतींनी अक्षरशः पळता भुई थोडी केली.. हा सारा इतिहास सांगताना हजारो श्रोत्यांना त्यांनी खेळवून ठेवले..
शिव व्याख्यानमालेच्या आयोजनाचे पंढरपूर मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. व्याख्यानासाठी आलेल्या सर्व व्याख्या त्यांनी देखील श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या कर्तुत्वाची आपल्या अनोख्या शैलीतून दखल घेतल्याचे व्याख्यानाच्या चारही दिवसात दिसून आले.
बंद पडलेला साखर कारखाना चालू करणे असो अथवा कोरोना काळात ऑक्सीजन प्लांटच्या निर्मितीतून हजारो लोकांचे जीव वाचवण्याचे कार्य असो अभिजीत पाटील नेहमीच सर्वात पुढे राहिले आहेत, असे प्रतिपादन श्री.बानगुडे यांनी केले..
यावेळी भीमराव देशमुख मेजर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलाताई रोंगे, भारत आबा भुसे, पितांबर कापसे, माजी उपसरपंच औदुंबर निकम, सुखदेव भोसले, विठ्ठल कारखान्याचे संचालक सिताराम गवळी, संचालक सुरेश भुसे, चंद्रभागा कारखान्याचे संचालक जयनाना देशमुख, पद्मसिंह दादा देशमुख, अनिकेत देशमुख, शाहू देशमुख,माणिक गंगथंडे, जगदीश देशमुख, गणेश देशमुख, आण्णा कचकल, अनिकेत देशमुख, प्रदीप डुणे, भैय्या जाधव, भरत पाटील, मोहन ताड, बाळासो भिसे, दत्ता पांढरे, मोहन ताड, ऋषिकेश गवळी, फुगारे सर, दत्ता कुलबर्णे, बालाजी
निकम, संतोष गगंथडे, महेंद्र कोळी, नितीन ताटे, नारायण शिंदे,याकार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सिताराम भुसे, रवींद्र देशमुख, नानासाहेब देशमुख,संजय गवळी सर, बाबुराव नवकटे, संकेत पैलवान, नितीन ताटे, विनायक भुसे यांनी यशस्वी नियोजन करून कार्यक्रम पार पाडला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा