गाणे वाजवण्यावरून वाद - शिक्षकांना शिवीगाळ करून धमकी
आरिफ शेख /सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी शिवशाही न्यूज
सिंदखेडराजा तालूक्यातील देऊळगाव कोळ येथे प्रजासत्ताक दिनी येथील प्राथमिक शाळेच्या कार्यक्रमात गाणे वाजवण्यावरुन धिंगाणा घालणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हकीकत अशी की, तालुक्यातील देऊळगाव कोळ येथे प्रजासत्ताक दिनी येथील प्राथमिक शाळेतील मुलामुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भिमाकोरेगाव हे गाणे तुम्ही आगोदर का घेतले नाही. या कारणावरून एका जोडप्याने शिक्षकाच्या हातातील माईक हिसकावून त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद शिक्षक ज्ञानेश्वर पांडूरंग गाडेकर (वय ५१ वर्ष) यांनी बीबी पोलीस स्टेशनला दिली.
यावरून पोलीसांनी आरोपी सौ. ज्योती गौतम मोरे व गौतम साहेबराव मोरे (रा. देऊळगाव कोळ) या पती-पत्नी विरुद्ध अ. क्र. १२/२०२४ कलम ३५३, ३३२, २९४, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन बास्टेवाड हे करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा