मंगळवेढा पोलिसांची विशेष कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
मंगळवेढा शहरातील जुना बोराळे नाक्याजवळ मकानदार यांच्या वीट भट्टी वरती ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव शिंदे वय वर्षे 25 डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून नग्न अवस्थेत या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. ही माहिती मंगळवेढा पोलीस ठाणे येथे मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहायक पोलिस निरीक्षक डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे, सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे, शेटे, दाते शेख पाटील मोरे लेंडवे पवार जाधव दुधाळ आवटे सर्वच पदाधिकारी रवाना होऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता घरच्या बाहेर अंगणामध्येच अंथरुणामध्ये झोपलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बॉडी पडलेली दिसली झोपेमध्ये दगड घालून खून केल्याची दिसून आले
तसेच शेजारी रक्ताचे मागलेले दगड हा सुद्धा बाजूलाच लावून पडल्याचे दिसले त्यावेळी पोलिसांनी आसपास चौकशी केली असता सदरील हा खून नातेवाईक अर्जुन गोरक राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी केल्याचे उघड झाल्याने त्या तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर कोणाच्या घटनेची चौकशी केली असता यामधील आरोपी अर्जुन गोरख शेगर यांच्या पत्नी नामे किरण व मयत ज्ञानेश्वर माऊली गोरख शिंदे यांच्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशयाचा कारणावरून त्यांच्या डोक्यामध्ये झोपेमध्ये असताना डोक्यात टाकून त्यांच्या थोडक्यात गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंजीत माने हे करत आहेत.
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा