एडवोकेट निशिकांत राजे जाधव यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
जिजाऊ मॉ साहेबांच्या जन्मोउत्वानिमीत्त मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे राज्यभरातून येणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या गाडयांना टोल माफी द्यावी अशी मागणी राष्ट्रमाता मा जिजाऊ. तेरावे वंशज अडवोकेट निशिकांत राजे जाधव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आपणास जिजाऊ माँसाहेब यांचा वंशज मातृतिर्थ सिंदखेडराजा जि.बुलडाणा या नात्याणे आपणास विनंतीपुर्वक निवेदन करतो की, आपण जिजाऊ माँ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराचे पाईक आहात हे सर्वश्रुत आहे. दि.१२/०१/२०२४ रोजी शुकवारला माँ साहेब यांची जयंती आहे म्हणजेच जिजाऊउत्सव आहे यानिमीत्त संपुर्ण देशामधुन जिजाऊ माँ साहेबांना वदंन करण्यासाठी व येथील माती भाळी लावण्यासाठी मातृतिर्थ सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे लाखो भक्त देशभरातुन येत असतात व नतमस्तक होत असतात. सदर येणारे सर्व जिजाऊ भक्तांच्या गाडयांना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने टोल माफी दयावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा