maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन

माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती 
mla samadhan autade, prashant paricharak, mangalwedha, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरातील मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आ आवताडे यांच्या हस्ते मंगळवेढा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंगळवेढा शहरातील सिटी सर्व्हे २७१ या जागेमध्ये साकार होणाऱ्या  दिव्यांग भवनचे भूमिपूजन ९.३० वाजता, त्यानंतर सकाळी १०.०० वाजता मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक १७ मधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे, 
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारतीपासून मुद्गुल ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, साठे नगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २७१ मधील आरक्षण क्रमांक ५६ मधील जागेस संरक्षण भिंत बांधणी व सुशोभीकरण करणे, मंगळवेढा नगरपरिषद गट नं.४७ नागणेवाडी येथे ७ लाख लीटर क्षमतेची आर सी सी उंच टाकी बांधणे या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामांसाठी आ आवताडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. मंगळवेढा शहरातील मूलभूत व पायाभूत विकास बाबींची पूर्तता होऊन मतदार संघाच्या धोरणात्मक प्रगतीचा वेग गतिमान होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विविध विकास योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध केला आहे. त्या निधीच्या अनुषंगाने वरील सर्व विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, प्रांताधिकारी बी.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी चरण कोल्हे, मंगळवेढा नगरपरिषद नगर अभियंता प्रशांत सोनटक्के, कर निरीक्षक विनायक साळुंखे तसेच तालुक्यातील सामाजिक- राजकीय कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमांसाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !