विश्वनाथ घुगे यांची राज्य प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी संघटना सेल पदी कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री विश्वनाथ घुगे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्य राज्य नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी संघटना राज्य प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
विश्वनाथ घुगे हे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्याच प्रकारे ते सध्या कार्य करीत अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. विश्वनाथ घुगे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या राज्यप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माझ्या राज्य प्रमुख पदी निवडी साठी वसमतचे आमदार राजू नवघरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी बांगर, परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण व वाढीसाठी प्रयत्न करत राहील. असे विश्वनाथ घुगे यांनी सांगितले.त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संघटनेतील सर्व कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्या सोबत राहिल.आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहील. असे विश्वनाथ घुगे यांनी सांगितले आहे. राज्य प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा