राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय हिंगोली आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली शहरातील शिवाजी महाविद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला यावेळी. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी,हिंगोली तहसीलदार नवनाथ वगवाड, कळमनुरी तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, माजी शिक्षणाधिकारी तथा संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एस. क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी शिक्षणाधिकारी तथा संस्थापक शिवाजी पवार यांनी नव मतदार यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी असे सांगितले की निवडणूकीचे महापर्व आहे. या महापर्वात सर्वांनी मतदान केले पाहिजे. आता तर निवडणूक आयोगाने असे जाहीर केले आहे कि. 17 वर्षा नंतर आपले नाव नोंदणी करता येणार आहे. तुमची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. वोटर हेल्प लाईन चा वापर करावा. या निमित्ताने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील 17 वर्षे झालेल्या नव युवक युवतींनी नाव नोंद करावी. जेणे करून कुणी ही मतदाना पासून वंचित राहू नये. त्याच आपल्या जिल्ह्यातील मयत झालेल्या लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा