इंदोरीकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडला पारायण सोहळा
शिवशाही न्युज वैजापूर तालुका प्रतिनिधि अनिल सुर्यवंशी
परसोडा येथे चालु असलेला पारायण सोहळा इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने पार पडला. वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे दरवर्षी प्रमाणे चालु असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा इंदोरीकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या थाटामाटात पार पडला .
यावेळी तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे सर यांनी महाराजांना पुष्पहार घालून कीर्तनाचे आनंद घेतला.
त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव,भाजप तालुकाध्यक्ष नारायण भाऊ कवडे ,सरपंच राजुभाऊ राजपूत,गणेश कवडे,निलेश परदेशी,मनोज लालसरे, गणेश सोनवणे,रामभाऊ कवडे,संदीप धाटबळे,किरण कवडे,रमेश महेर,बाळुभाऊ कवडे,शिवाजी कवडे,ज्ञानेश्वर कवडे यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील महिला व षुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा