देऊळगाव कोळ येथील वातावरण तापले
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देऊळगाव कोळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनी सुजाता प्रमोद मोरे वय ९ वर्ष हीने कार्यक्रमात भाग घेतला होता कार्यक्रम 8:30 वाजता सुरू झाल्यानंतर सुमारे 10:30 वाजता तिचा नंबर आला तिचा नंबर येण्याआधी 8 जणाचे डान्स झाले होते ज्यावेळी तिचा नंबर आला तेव्हा साउंड सिस्टीम वाल्याने अंबाबाईचे गाणे वाजवले तेव्हा विद्यार्थिनी सुजाता मोरे हीची काकू यांनी तेथील शिक्षक असलेले श्री.नागरे व श्री पालवे यांना संपर्क साधून सोन्याने भरली ओटी हे गाणे सुजाताला नृत्यासाठी दिले असल्याची आठवण करून दिली आणि त्याच गाण्यावर तिची प्रॅक्टिस पण झाली असल्याचे सांगितले
त्यावेळी तेथील शिक्षक नागरे म्हणाला की तुमच्या जातीचे लोक असच करतात त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव कायंदे तेथे आला त्याने काहीही न बोलता सदर महिलेच्या गालावर चापटा मारल्या ते पाहून सरपंच अशोक कायंदे याने देखील शिवीगाळ करीत केस पकडुन मारहाण केली या घटने नंतर सदर महिलेने बिबी पोलीस ठाणे गाठून भा.द.वी. कलम. 354,323,504,506,34, व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्री सोनकांबळे हे करीत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा