ढोल ताशाच्या गजरामध्ये रथातून काढली भव्य मिरवणूक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
भारतीय सेनेतील सेवानिवृत्त झालेले मा. नायक सुभेदार पांडुरंग कारभारी डोईफोडे यांचा उमरद गावच्या वतीने सत्कार करण्यात आला, व रथ ,ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाके लावून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. किनगाव राजा पासून जवळच असलेली उमरद देशमुख येथील पांडुरंग डोईफोडे आज भारतीय सेनेतील सेवानिवृत्त झाले व आपल्या मायभूमी मध्ये परतले व रथ लावून,उमरद पाट्यापासून ते संपूर्ण गावांमध्ये त्यांना रथात बसून मिरवणूक काढण्यात आली, गावकऱ्यांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून त्यांच्या स्वागताची तयारी केली या पंचक्रोशीत लोकांनी सेवानिवृत्त झालेले डोईफोडे साहेब यांना, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व आजी सैनिक व आजी सैनिक उपस्थिती
या पंचक्रोशीत नागरिक सर्व उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा