विद्यार्थ्यांना केले कायद्याविषयी मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (तालुका प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकिब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी जागरूकता कशी करावी? विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करावे
आणि सोशल मीडिया, फेसबुक, मोबाईलचा वापर टाळावा. त्यामुळे बालगुन्हेगार होण्यास आळा बसेल अशा अनेक विषयवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी नाचनवेल बिट जमादार लालचंद नांगलोद, पिशोर बीट जमादार विलास सोनवणे, पोलीस वाहन चालक गजानन कराळे, व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. नितीन जंगले यांनी सूत्रसंचालन केले तसेच आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा