गावाच्या प्रवेशद्वारातच घाणीचे साम्राज्य
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव (तालुका प्रतिनिधी रईस शेख)
सावळदबारा हे गाव सोयगाव तालुका आणि महाराष्ट्रात महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामींच्या नावाने ओळखले जाणारे प्रसिध्द देवसस्थान म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे येथे भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. परंतु गावाच्या प्रवेशद्वारातच भाविकांना प्रथम घाणीचे साम्राज्य आणि तुडुंब भरलेल्या नाल्या व गंटारीचे दर्शन करावे लागते. याच्यावरून लक्षात येते की गावाचा किती विकास झाला आहे. वाढत्या घाणीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सावळदबारा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, हे सर्वच जबाबदार लोक गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गावात विविध भागात अनेक ठिकाणी नाल्या भरून तूंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्याचबरोबर गावात कोणीही कुठेही अतिक्रमण करत आहे. स्वच्छतेबाबत अधिकारी व ग्रामसेवक लक्ष देत नसल्याने गावातील नागरिकांमध्ये संताप आहे. ग्रामसेवक सतत गैरहजर राहत आहे त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबली आहेत. याबाबत गटविकास अधिकारी यांनी त्वरित नोंद घेऊन ग्रामसेवकाची कान उघडणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा