महसूल प्रशासनाचा वाळूमाफियांना दणका रात्रभर सर्च ऑपरेशन नऊ टिप्पर पकडले

खडकपूर्णा जलाशयासह पूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’
'Task Force' to prevent sand smuggling ,Dr. Kiran Patil , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
खडकपूर्णा जलाशयासह पूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी रोखण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी टास्क फोर्स निर्माण केला असून, बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्यावर या टास्क फोर्समध्ये महत्वपूर्ण जबाबदारी सोपावली आहे. तसेच, परिसरातील वाळूमाफिया यांच्यासह वाळूतस्करांना मॅनेज झालेल्या स्थानिक पातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी यांनादेखील या कारवाईने मोठा झटका बसला आहे. 
दरम्यान, काल रात्री दीड ते पाच वाजेदरम्यान या टास्क फोर्सने चिंचखेड पॉइंटवर सर्च ऑपरेशन राबवून तब्बल नऊ टिप्पर पकडले. तर अनेक टिप्पर हे वाळू खाली करून रात्री पसार झाले. या कारवाईत बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस सहभागी झाले होते. अशी कारवाई सातत्याने केली जाणार असून, या कारवाईने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच महसूल प्रशासनाने खडकपूर्णा जलाशयात धडक कारवाई करून वाळूतस्करांच्या बोटी उध्वस्त केल्या होत्या.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !