दि .5 रोजी श्री क्षेत्र शिऊर येथे पार पडला शंकर स्वामीचा समाधी सोहळा.
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी
खरे तर स्वामींनी समाधी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला घेतली होती.यामागची आख्यायिका अशी आहे कि,स्वामींनी प्रतिपदेला समाधी घेतली व नुकतेच बाबा पाद्ये व काही साधू महात्मे स्वामींच्या दर्शनासाठी शिवूर येथे आले. ते ठिकाण म्हणजे श्री विठ्ठल मंदिर.स्वामींनी अगोदर समाधी ही विठ्ठल मंदिरात घेतली होती.व बाबा पाद्ये यांनी स्वामींनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली व स्वामी समाधी तून उठून बसले या अर्थी सिद्ध होते की स्वामींची संजीवन समाधी आहे.
सर्व महात्म्यांनी स्वामींचे दर्शन घेतले व बाबा पाद्ये यांनी स्वामींना नमस्कार करून श्रीमद भागवत कथेला प्रारंभ केला.सात दिवसात कथा पूर्ण झाली.म्हणजे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते
मार्गशीर्ष वद्य सप्तमी अशा या तिथीला श्रीमद भागवत कथा स्वामींनी श्रवण केली.काही संत मंडळी स्वामीं बरोबर भागवत श्रवण करत होते तर त्यात एका साधू माहात्म्या कडे श्रीमारोतीरायांची मूर्ती होती व भागवत झाल्यानंतर सर्व साधू उठले व मारोती रायांची मूर्ती घेता आली नाही कारण साक्षात मारोती हे स्वामींच्या सेवेसाठी आले असे प्रमाण सापडते.
समभाव तुमची दृष्टी आला मारोती सेवेला |
ही कीर्ती देखोनिया चरणी विनटला मल्लपा ||
आजही ती मूर्ती आमच्याकडे आहे.विठ्ठल हे लाखे स्वामी घराण्याचे देवघर आहे. आजही आम्ही गेल्या २७८ वर्षा पासून सर्व जतन करून ठेवले आहे.
आणि पुढे स्वामी समाधी घेणार असल्यामुळे सर्व संत मंडळी शिवूर येथे आली व सर्वांनी सप्तमीला रात्र भर जागर करून, सकाळी काकड आरती झाली व नगर प्रदक्षिणा करून स्वामींनी आपल्या स्वत: च्या वाड्यात भट्टी पेटवून आमटी भाकरीचा प्रसाद करून सर्व भाविकांना दिला व प्रणिता तीर्थ काठी पूर्वाभिमुख बसून मार्गशीर्ष अष्टमीला समाधी घेतली.
स्वामींचा समाधी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य एकादशी पर्यंत असतो.
आमटी भाकरी साठी गेल्या द्विशतका पासून ठरलेल्या गावांनी भाकरी आणायच्या असतात व स्वामींचे वंशज आजही भीक्षा मागून आमटी भाकरीचा प्रसाद भाविकांसाठी करत आहे.
हे स्थान माहात्म्य व स्वामींची ओळख आहे.गेल्या २७८ वर्षा पासून आजही लाखे स्वामी घराण्यातील सर्व स्वामी वंशज परंपरा सांभाळत आहे.
आणि सर्वांनी भागवत श्रवण करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिरात यावे.कारण हे स्थान प्रत्यक्ष स्वामींचे व मारोती रायांचे आहे.म्हणून मुमुक्षू साधकांनी नक्कीच यावे.स्वामींचे आठवे वंशज आकाश महाराज लाखे स्वामी.
श्री शंकरस्वामी महाराज लाखे यांचा समाधी सोहळा श्रीक्षेत्र शिवूर ता. वैजापूर जि. संभाजी नगर. गेल्या २७८ वर्षांपासून श्रीमद भागवताची परंपरा लाखे स्वामी घराण्याकडे आहे.
दि.२८/१२/२०२३ ते ०३/०१/२०२४.या सात दिवसात भागवताचार्य श्री हरी महाराज वैष्णव जालना याचे भागवत कथा पारायण झाले .शेवटी काल्याचा कीर्तन झाले नंतर भाविकांनी महाप्रसाद घेऊन सोहळ्याची सांगता केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा