परिसरात खळबळ, बिबी पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या चोरपांगरा (वीर पांग्रा) येथे आनंदा तुकाराम डहाळके (वय ५२) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
सविस्तर असे, की चोरपांग्रा (वीर पांगरा, ता. लोणार) येथे आनंदा तुकाराम डहाळके वय वर्ष ५२ रा. वीरपांग्रा, हल्ली मुक्काम काटे मानवली, जिल्हा ठाणे शहर येथे व्यवसायानिमित्ताने राहतात. काही कामानिमित्त सकाळी ते गावी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटाच्या दरवाजा तोडलेला दिसला व सर्व सामान अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. त्यांनी कपाटामध्ये पाहिले असता, त्यांना कपाटातील रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्याबरोबर त्यांनी बिबी पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.
त्यानंतर ४ जानेवारीरोजी प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये सदर व्यक्तीच्या घरातील सोन्याची गहुमण्याची पोथ, सोन्याची एकदानी, सोन्याच्या पाटला एक जोड, फॅन्सी टॉप्स, चांदीचे कडे एक जोड, चांदीचे जोडवे, सोन्याची ब्रासलेट, एक सोन्याची चैन, सोन्याची रिंग जोडी, सोन्याचे पेंडॉल व त्यांच्या आईच्या कपाटामध्ये ठेवलेले नगदी रक्कम तीन हजार रूपये असा एकूण ४ लाख ४९ हजार ६८५ रुपयाचा ऐवज व नगदी रोख रक्कम चोरीला गेले. अज्ञात चोरट्या विरोधात बीबी पोलीसांनी 457,380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा