२७-२८आणि२९ जानेवारी अशी तीन दिवसीय व्याख्यानमाला
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सामाजिक चळवळीतील अग्रेसर असलेली लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा हिंगोली यांच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान दिनांक २७, २८ व २९ जानेवारी २०२४,दररोज सायंकाळी ७.३० वाजता कै.शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलिला मैदान, हिंगोली येथे होणार आहे.
दि.27जानेवारी 2024 रोजी प्रमुख व्याख्याते प्रसिद्ध लेखक व अभ्यासक केशव शेकापूरकर यांचे अनुसुचित जाती, आरक्षण वर्गीकरण: वास्तव आणि विपर्यास या विषयावर, व प्रा.डॉ.संभाजी बिरांजे (प्रसिध्द विचारवंत,बार्टी संस्थेचे (पुणे ) संशोधन आधिकारी, हे मातंग समाजाच्या प्रगतीतील अडथळे,कारणे आणि उपाय या विषयावर, आणि अॅड. वैशालीताई डोळस (प्रसिध्द विचारवंत) : बहुजन समाजातील अंधश्रध्दा,आजचे स्त्री जीवन आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या तिन्ही दिवशी होणाऱ्या समाज प्रबोधनच्या कार्यक्रमाला बहुजन समाजातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या प्रबोधनाच्या विचारांचा आनंद घ्यावा असे लहूजी साळवे कर्मचारी महासंघ शाखा हिंगोली यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा