माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या ग्रंथालयास अनमोल ग्रंथ व डिस्ट्रॉयर मशीन भेट
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द ह कवठेकर प्रशालेत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला या प्रसंगी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे सदस्य डॉक्टर श्री मिलिंद जोशी, श्री ज्ञानेश कवठेकर श्री.संजय कुलकर्णी तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रशालेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंदार लोहकरे सहसचिवा सौ दिपाली सतपाल हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वर्षात देशाने आज पर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांनी मांडला व देशापुढील आव्हाने व विद्यार्थ्यांची कर्तव्य याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या 1991 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या ग्रंथालयास अनमोल असे ग्रंथ व डिस्ट्रॉयर मशीन भेट दिली. याप्रसंगी मा.पर्यवेक्षक श्री मुंढे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक श्री आर जी केसकर यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा