रामदास पाटील सुमठाणकर यांचे मतदार दिनानिमित्त आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
वसमत-आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला महत्वपूर्ण अधिकार म्हणजे मतदानाचा हक्क.आपल्या एका मतात देशाची व्यवस्था बदलण्याची ताकत असते.
देशाला महासत्ता बनविण्याची ताकत असते.हिंगोली लोकसभेतील वसमत विधानसभेत नव मतदारांना मार्गदर्शन करतांना रामदास पाटील बोलत होते.
नव मतदार नोंदणी अभियानाचे उद्दिष्ट लोकशाही मजबूत करण्याचे तसेच या लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढून लोकशाही मजबूत करणे हे आहे.
मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे.लोकशाही सदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास व विकासाला गती येण्यास भरीव मदत होते.याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामुख्याने बजावणे नितांत गरजेचे आहे.मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासारखेच आहे.
मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी असे पाटील सांगतात.
मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना जागृत करण्याची नितांत गरज आहे. म्हणून आपण १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींना व लग्न करुन सासरी आलेल्या नववधूना या माध्यमातून आवाहन करतो की, हिंगोली लोकसभा क्षेत्रातील वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही.
अशी अपेक्षा व्यक्त करतो असे सांगितले. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदान नोंदणी न केलेल्यांनी आपली मतदान नोंदणी करावी व नव मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण व आपल्या कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरुपात सहकार्य करावे असे आवाहन ही रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा