हिंगोली लोकसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन बूथ-पन्ना स्तरापर्यंत मजबूत झाले
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली लोकसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन बूथ-पन्ना स्तरापर्यंत मजबूत झाले असून आगामी लोकसभा सर्वत्रिक निवडणूकित भाजपचा उमेदवार निवडून येईल आणि २०१९ चा यशाचा विक्रम 2024 ला मतदार राजा मोडीत काढून "अबकी बार-400 पार" करतील असा विश्वास रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील 3 वर्षांपासून लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून सूक्ष्मपने तयारीला लागली असून हिंगोली,कळमनुरी वसमत,किनवट, उमरखेड आणि हदगाव या 6 विधानसभा क्षेत्रात 1990 बूथ प्रमुख 453 शक्तिकेंद्र प्रमुख आणि 714 सुपर वॉरियर्स च्या माध्यमातून हिंगोली लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत झालेले आहे.सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून सूक्ष्मपणे बूथ बांधणी केली असून प्रत्येक बूथ वर 51% पेक्षा जास्त मतदान घेण्याचं लक्ष निर्धारित केलं आहे.त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हूवरचणा आखत विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत असे रामदास पाटील यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्वच्या भेटी गाठींचा ओघ वाढला असल्याने सामान्य व्यक्ती ही निवडणूक मोडवर आल्याचे चित्र मतदारसंघात बघायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय मंत्री,वरिष्ठ नेत्यांच्या सतत प्रवास होत असून आढावा बैठका पार पडत आहेत.यातूनच महायुती मध्ये हिंगोलीची जागा जर भाजपला संधी मिळाली तर आम्ही पूर्ण ताकतीने लढून विक्रमी मताने निवडून आणू अशी ग्वाही रामदास पाटील यांनी दिली.उमेदवारी बाबत पक्ष श्रेष्टी निर्णय घेऊन जे आदेश देतील ते पक्ष आदेश आमच्यासाठी अंतिम असतील असेही ते बोलले.
लोकसभा क्षेत्रात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आणि बैठका यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली असून सगळीकडे उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.आता मतदार विक्रमी मताने भाजपचा उमेदवार निवडून देण्यासाठी तयार आहेत.
२०१४ पासून देशातील राजकारण बदलले आहे.मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची होत असलेली विकासात्मक वाटचाल देशाला एक बलशाली राष्ट्र बनविण्याकडे घेऊन जात आहे.आज घडीला भाजप विरोधी पक्ष मुळासकट हादरलेले आहेत,कारण मतदार राजा आता जात,पात,धर्म यांच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देत आहेत.देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे.अंतर्गत विकासाला प्राधान्य देत आहे.यांमुळे देश मोदीजीच्या नेतृत्वात एक बलशाली राष्ट्र बनत आहे.
भारतीय जनता पार्टीने प्रत्येक विधानसभेत १०० सुपर वॉरियर्स निर्माण करून या सुपर वॉरियर्सच्या माध्यमातुन पक्षाचे ध्येय धोरणे समजावून सांगण्यासाठी तसेच मोदी सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जन कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांना देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात कसं जोडता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे.आज घडीला हिंगोली मतदासंघांत मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असल्याने भाजपचे पारडे जड आहे असा विश्वास रामदास पाटील यांनी व्यक्त केला.
हिंगोली लोकसभा क्षेत्रात सर्व भाजपा कार्यकर्ते प्रवास करून पक्ष संघटनाचे जाळे मजबुत विणले गेल्याने भाजपाचा झेंडा फडकवन्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत.संघटन कौशल्यातून,घर घर सम्पर्क अभियानातुन,वॉल पेंटिंग,
धन्यवाद मोदीजीं,विजयी रथ,
मोदी@9,फ्रेंड्स ऑफ बीजेपी माध्यमातुन मोठा जनाधार भाजपला मिळाला आहे.हिंगोली लोकसभेत भाजपामय वातावरण निर्माण झाले असून मतदारांनी आता मोदीजीं च्या पाठीमागे राहण्याचे मन बनवलं आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेत भाजपा विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास रामदास पाटील सुमठाणकर यांनी व्यक्त केला.
हिंगोली लोकसभेत भाजपा चे तीन विद्यमान आमदार असल्याने,तसेच अनेक जिल्हा परिषद गट,पंचायत गण आणि नगरपालिका सदस्य असल्याने,सर्वात जास्त ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा कडे असल्याने भाजप ताकतीने मैदानात उतरेल आणि जिंकेल. त्यातूनच भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्म भूमीत शिल्लक असलेला विकासाचा अनुशेष भरुन निघेल असा आशावाद रामदास पाटील यांनी व्यक्त केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा